सुहासिनी पाटील तसमीन जमादार व सुजाता अर्जुने यांचे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैद्य.
मुरगूड ( शशी दरेकर )

मुरगूड नगरपालीकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ उमेदवारी अर्ज अपात्र झाले. तर नगरसेवक पदासाठी २०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ११६ अर्ज अपात्र झाले आहेत.

त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तीन आणि नगरसेवक पदासाठी ९० उमेदवार पात्र ठरले आहेत.

त्यामुळे मुरगूड नगरपालिका निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रविणसिंह पाटील, राष्ट्रवादीच्या तसमीन राजेखान जमादार व शाहू आघाडी च्या सुजाता अनिल अर्जुने या तीन उमेदवारांचे नगराध्यक्ष पदासाठीचे अर्ज वैद्य ठरले आहेत. तिन्हीपैकी सुहासिनी पाटील विरुद्ध तसमीन जमादार यांच्यात सरळ लढतीची शक्यता आहे. त्यामुळे सुजाता अर्जुनें काय पवित्रा घेणार या भूमिकेकडे सर्वांचे लागले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्या नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
