कागल, जि. कोल्हापूर (प्रेस नोट): कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत ‘मतदार जागृती अभियान’ (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी, विशेषतः युवा मतदारांनी, निवडणुकीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हे अभियान सुरू आहे.
🎯 जनजागृती उपक्रम:
मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक सूचनागार सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वयंसेवी संस्था, व्यापार संघटना आणि सार्वजनिक ठिकाणी वितरित करण्यात आले आहेत.
मतदान करण्याची शपथ शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बाजारपेठा आणि नगरपरिषद सभा अशा विविध ठिकाणी नागरिकांना मोठ्या संख्येने देण्यात आली.

महाविद्यालयांमध्ये युवा मतदार नोंदणी शिबिरे तसेच मतदार जागृती रॅली, चित्रकला/पोस्टर स्पर्धा आणि मतदार जनजागृतीपर व्याख्याने आयोजित केली जात आहेत.

मतदानाची तारीख, मतदान केंद्रांची माहिती आणि मतदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमुख चौक, बसस्थानक परिसर, शासकीय इमारतींवर, तसेच बाजारपेठेत आकर्षक फलक व होर्डिंग्ज लावले आहेत.
📱 डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर:

SVEEP अंतर्गत बसमतार जागृती संदेश तसेच मतदारांना मतदान आणि मतदार यादीची माहिती देण्यासाठी खासगी आस्थापना अंतर्गत मॉल, शोरूम, बँक, दुकानात, कर्मचारी ग्राहक यांना मतदान शपथ देण्यात आली.
तंत्रज्ञान साधून डिजिटल/सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून व्हिडिओ/शॉर्ट्स प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
मतदान जनजागृतीसाठी विविध लेख, बातम्या व माहितीपूर्ण निवेदने वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सोशल मीडियाद्वारे नियमित प्रकाशित केली जात आहेत.
मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट्स उभारले आहेत.
📝 आवाहन आणि पुढील कार्यवाही:
कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता निवडणुक निर्णय अधिकारी/सहायक निवडणुक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांनी मतदारांना अचूक आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेला बळकटी द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.