राजे गट मुरगूड नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्षासह ताकतीने लढवणार – अमरसिंह घोरपडे


मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपालिका निवडणुक ताकदीने लढविण्यची राजे समरजिततसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी चालू आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाकडून मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षसह नगरसेवकच्या सर्व जागा लढविण्याच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवा आसे प्रतिपादन अमरसिंह घोरपडे यांनी केले.

Advertisements

कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुरगूड येथे राजे फौंडेशनच्या  बैठकीत बोलताना त्यांनी इच्छुकांनी उमेदवारीबाबत संपर्क साधला  होता त्या वेळी ते बोलत होते. गटाच्या शिस्तीप्रमाणे सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत. उमेदवारीसह समविचारी मंडळीसोबत युती किंवा आघाडीबाबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करून सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार करावा.

Advertisements

यावेळी राजे बँकेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक एम पी पाटील म्हणाले  गत पाच वर्षाच्या कालावधीत राजे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या कॅम्पच्या माध्यमातून शहरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. आरोग्य शिबिराचाही अनेक नागरिकांना लाभ झाला आहे. याशिवाय शाहू साखर कारखाना, राजे बँक राजे  फाउंडेशन व  जिजामाता महिला समिती व  इतर संस्थांच्या माध्यमातून गटाच्यावतीने विविध उपक्रम या माध्यमातून राजे गटाने नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. याचा फायदा या निवडणुकीत गटाच्या  उमेदवारांना होणार आहे.

Advertisements

येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे,तर नगरसेवक पदासाठी दहा प्रभागातून वीस जणांना संधी मिळणार आहे. या सर्व जागांवर सक्षम व प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकूण पासष्टहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.

या वेळी शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस,राजे बँकेचे संचालक अमर (छोटू) चौगले, सदाशिव गोधडे,अनिल अर्जूने, अमर चौगले,संतोष गुजर,मारुती नलवडे, सर्जेराव भारमल, भिकाजी रामाणे, साताप्पा शिरसेकर, पांडुरंग डेळेकर, सुहास दरेकर, जयवंत पाटील, बाळासाहेब डेळेकर ,नाना डवरी,सचिन गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वागत राजू चव्हाण यांनी तर प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले यावेळी राहुल खराडे,  यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन संग्राम साळुंखे यांनी तर आभार विजय राजगिरे यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!