मुरगूड नागरी सह. पतसस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : अल्पावधित नावलौकीक मिळवलेली मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वेसर्वा हाजी धोंडीबा मकानदार होते.

Advertisements

यावेळी पहिल्या पाच सभासद ठवीदारानां भेटवस्तूंचे वितरण संस्थेचे चेअरमन जावेद मकानदार, व्हा. चेअरमन मधूकर कुंभार, सुहास खराडे, निवास कदम, पांडूरंग कुडवे, या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या भेटवस्तू वितरण प्रसंगी संस्थेचे मॅनेजर अजितकुमार कापसे म्हणाले संस्थेने पहिल्याचवर्षी दहा कोटी ठेवीचे उदिष्ठ पूर्ण केले असून दिपावली पाडव्या निमित्य १३ महिन्याच्या ठेवीवर संस्था दहा टक्के आकर्षक व्याजदर ही योजनां ३१ / १० / २०२५ या कालावधी पर्यंत राबविणार असल्याचे सांगितले.

या सभासद भेटवस्तू वितरण प्रसंगी सभासद, ठेवीदार मोठया संख्येने उपस्थित होते. स्वागत मॅनेंजर अजितकुमार कापसे यानीं केले तर आभार सचिन मिसाळ यानीं मानले.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!