मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल लिटल मास्टर गुरुकूलम शाळेला मा. प्राध्यापक मिलिंद जोशी यानीं भेट देऊन शाळेच्या विद्यार्थ्यानां आध्यात्मिक ज्ञानातून मौलिक असे मार्गदर्शन करत कृतीतून शिक्षण देतानां विद्यार्थाच्या भावविश्वात सर्वजण रमून गेले.
मराठीमध्ये आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जिवनाच्या उच्च, शाश्वत आणि आत्मिक सत्यांचा अभ्यास व ज्ञानाचा आपल्या दैनदिन जीवनात उपयोग करून ज्ञान आत्मसात करता येते असे त्यानी मुलानां मार्गदर्शन केले. यावेळी दोन तास आध्यात्मिक विषयाचे विविध पैलू कृतितुन मुलाना सांगितल्या.

याप्रसंगी अध्यक्ष सुभाष अनावकर, सौ. सुमन अनावकर, अलका गायकवाड, मनिषा पाटील, जोती डवरी, सायली चौगले, रुपाली सुतार, प्रियांका पाटील, दिपाली कदम, यांच्यासह गुरूकुलमचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत सुमन अनावकर यानीं केले तर आभार अध्यक्ष सुभाष अनावकर यानीं मानले.