भारतीय संस्कृतीमध्ये आजही शिक्षकाना मानाचे आणि आदराचे स्थान – प्रा. रामचंद्र सातवेकर


मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात ५ सप्टेंबर २०२५ ” शिक्षक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक हावळ होते.

Advertisements

प्रारंभी माजी शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत हावळ यानीं उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय प्रमुख विनायक हावळ यांचे अध्यक्ष पदासाठी नांव माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. सामंत यानी  नाव सुचविले.

Advertisements

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ . राधाकृष्णन व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्राचार्य पी .डी. मगदूम यानी प्रास्ताविक केले .

यावेळी रामचंद्र सातवेकर सर म्हणाले भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचे स्थान मानाचे आणि आदराचेआहे हे स्पष्ट केले . ब्रिटीश काळात महात्मा फुले व क्रांतीज्योती स्वावित्रीबाई फुले यानां बहुजन समाज शिकावा , शिक्षणाव्दारे बुद्धीमान व्हावा यासाठी व माहिलासाठी शिक्षणाची व्दारे खुली व्हावीत म्हणून त्यानीं केलेले अलौकीक कार्य  स्पष्ट केले.

Advertisements
  • WATER TAPE FOR LEAKAGE : The aluminium foil tape adopts high polymer synthesis butyl glue, which owns strong adhesive ab…
  • EXCELLENT WATERPROOF: Leakage repair waterproof tape can be used for repairing, sealing, hose, pipe, surface crack etc. …
  • EXCELLENT WATERPROOF: Leakage repair waterproof tape can be used for repairing, sealing, hose, pipe, surface crack etc. …

स्वातंत्र्यामध्ये डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यानीं उच्य विद्या प्राप्त करून अध्यापनाचे महान कार्य केले. त्यानां भारताच्या राष्ट्रपती पदाचा बहुमान मिळाला. त्यांच्या कर्तृत्वाने भारतीय संस्कृती , शिक्षकांचा सन्मान व आदराचे स्थान याचा जगभरात डंका वाजविला . त्यांच्या जन्मदिनाचा ” शिक्षक दिन ” म्हणून आदराने व सन्मानाने हा दिवस साजरा केला जातो .आजही भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकानां मानाचे व आदराचे स्थान आहे असे सातवेकर यानीं स्पष्ट केले.

यानंतर ३० शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला . या सत्कार प्रसंगी प्रा. डी. डी. चौगले, प्रा. चंद्रकांत जाधव यानी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुरगूड शहरातील लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकानां गुलाबपुष्प देऊन पेढा भरविला व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . किशोर पाटील यानीं केले . संचालक आर .डी. चौगले यानीं आभार मानले.

कार्यक्रमासाठी संस्था सचिव सखाराम सावर्डेकर, संचालक सदाशिव एकल, सिकंदर जमादार, गणपती सिरसेकर, एस .व्ही. चौगले, अशोक डवरी, पी .आर. पाटील, सदस्य मारूती रावण, सदाशिव यादव, प्रदिप वर्णे, दादोबा बरकाळे, पी .जी. चौगले, दादोबा मडिलगेकर, रामचंद्र रणवरे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका, नागरीक उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!