सैन्यात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना नाशिकमध्ये मोफत प्रशिक्षणाची संधी

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 62 साठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

या शिबिरासाठी उमेदवारांची निवड 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणाऱ्या मुलाखतीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी दिली.

Advertisements

पात्रतेचे निकष

एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतीकडे खालीलपैकी किमान एक पात्रता असणे आवश्यक आहे –

Advertisements
  • कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) परीक्षा उत्तीर्ण व एसएसबी मुलाखतीसाठी पात्रता.
  • एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट A अथवा B ग्रेडसह उत्तीर्ण व एनसीसी ग्रुप मुख्यालयाकडून शिफारस.
  • टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) साठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर.
  • विद्यापीठ प्रवेश प्रणाली अंतर्गत एसएसबी कॉल लेटर किंवा शिफारस यादीतील नाव.

आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी Department of Sainik Welfare Pune (DSW) च्या वेबसाईटवरून SSB-62 कोर्ससाठी प्रवेशपत्र व आवश्यक परिशिष्टे भरून सोबत आणणे गरजेचे आहे.

संपर्क

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

  • ई-मेल: training.petenashik@gmail.com
  • दूरध्वनी : 0253-2451032
  • व्हॉट्सअॅप : 9156073306 (कार्यालयीन वेळेत)

यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनीही पात्र उमेदवारांनी ही संधी साधावी, असे आवाहन केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!