मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुरगूड शहरातून पाठिंबा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुरगूड शहरांमधून आज सर्व समाजाच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शविण्यात आला.

Advertisements

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास समर्थन देण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा”, “मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”,, “मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा जोरदार घोषणा देत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.

Advertisements

यावेळी समन्वयक संतोष भोसले यांनी प्रास्ताविकामधून मराठा समाजाच्या मागण्यांविषयी आणि सुरू असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली माजी नगरसेवक सुहास खराडे ओंकार पोतदार ,  यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा जाहीर केला. संकेत भोसले यांनी आभार मानले,

Advertisements

यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, एस व्ही चौगले, जयसिंग भोसले, सर्जेराव भाट, दत्तात्रय मंडलिक, खाशाबा भोसले, विक्रम गोधडे, मारुती पुरीबुवा, महादेव पाटील, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, दत्तात्रय साळोखे, शशिकांत मेंडके, पांडुरंग चौगले, भगवान लोकरे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!