मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल युथ सर्कल मंडळ पाटील गल्ली यांच्यावतीने गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री अस्मिता खटावकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाखाली सदरच्या स्पर्धा होणार आहेत.
खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धा जिंकणाऱ्या महिलांसाठी प्रथम क्रमांक पैठणी व चषक तर दुसरा क्रमांक चंदेरी साडी व चषक तृतीय क्रमांक डिनर सेट असे एकूण बक्षिसे १०महिलांना देण्यात येणार आहेत.

तसेच इतर महिलांमधून १० बक्षीसही देण्यात येतील कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील या असणार आहेत मुरगूड शहर आजी माजी नगराध्यक्षा व नगरसेविका, विविध संस्थाच्या संचालिका उपस्थित राहणार आहेत.
तरी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व महीलांनी A to Z लेडिज शॉपी मुरगूड
धनश्री चव्हाण – ७२७६१९४८३६
नंदिनी सांरग – ८०८७३६४७४७
रुपाली प्र.वंडकर -९९६०६८५५९८
मुरगूड येथे आपली नावे नोंद करावीत असे आव्हान संयोजकांनी केले आहे.