मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचे शानदार उदघाटन

उद्घाटन दिवशी ३१ लाख ठेवींचे संकलन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचा शानदार उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.

Advertisements

बुधवार दिनांक २०.०८.२०२५ रोजीच्या उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ३१ लाख ठेवीचे संकलन झाले. मुरगूड येथे अवघ्या सहा महिने कालावधीतच नावारूपाला व सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या मुरगूड नागरी सहकारी पत संस्थेच्या शाखा लिंगनूरचे उद्घाटन मोठया थाटा माटात पार पडले.

Advertisements

मा. हाजी. बाळासाहेब बाबालालशेठ मकानदार, संस्थापक मुरगूड नागरी सह पत संस्था, मुरगूड , एम .जे. लकी ग्रुप मुरगूड यांच्या शुभहस्ते फित कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम अध्यक्षस्थानी
स्वप्नील कांबळे (सरपंच ग्राम पंचायत लिंगनूर ) हे होते.

Advertisements

या वेळी मयूर आवळेकर सदस्य ग्राम पंचायत लिंगनूर, नानासो घाटगे, संस्थापक, विठ्ठल रुक्मीणी दूध डेअरी, जोती चव्हाण, मा. चेअरमन, दत्त दूध डेअरी, संस्थापक चेअरमन श्री. जावेद बाळासाहेब मकानदार, एम. जे. लकी उद्योग समूह यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बाळासाहेब मकानदार यानीं संस्थेची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमावेळी दिवसभर चेअरमन जावेद मकानदार यानी सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या भेटी-गाठी घेतल्या. यावेळी स्वागत मुख्य शाखेचे मॅनेजर सचिन मिसाळ यानीं केले. तर आभार हाजी बाळासाहेब मकानदार यानीं मानले.

या कार्यक्रमासाठी संस्था सर्व संचालक मंडळ ,एम जे ऍग्रो इंडस्ट्रीज ,लकी परिवार ,एम जे लकी इंटरनॅशन स्कूल, एम जे लकी मार्ट, एम जे लकी सोशल फौंडेशन, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, मित्रपरिवार, लिंगनूर गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!