श्रावणात ‘वर्तेट’ ग्रंथाचे सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण

आडी (ता निपाणी): येथील संजीवन गिरीवरील श्रीदत मंदिरात पारायण कर्त्या भाविकांनी वर्तेट ग्रंथ पारायण समारोपाच्या अनुषंगाने दतगुरुच्या तसेच प .पू परमात्मराज महाराजांच्या दर्शनांसाठी मोठी गर्दी केली होती.

Advertisements

श्रावण महिन्यातीलपवित्र वातावरणात परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या ‘वर्तेट’ या आध्यात्मिक ग्रंथाचे समाज माध्यमाचा उपयोग करून सामूहिक पारायण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

Advertisements


श्रावण मासारंभ दि. २५ जुलै २०२५ रोजी सुरू झालेल्या या पारायणात बेळगांव, बेंगलोर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, नाशिक, नांदेड जिल्ह्यातील तसेच गोव्यातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. अशा रीतीने कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील भरपूर मोठ्या संख्येने भाविक या पारायणात सहभागी होते. ग्रंथवाचन सेवेकरी या ग्रूपच्या माध्यमातून पारायणात नांवनोंदणी करून पारायण सुरू झाले होते. २१ दिवस दररोज एक अध्याय वाचनाचा नियम पाळून भाविकांनी पारायण पूर्ण केले. तसेच काहींनी काही इतर कारणास्तव वैयक्तिक पातळीवर ३ किंवा ७ दिवसांचे पारायणही केले असल्याचे कळवले.

Advertisements


पारायणाच्या काळात भाविकांनी वाचनाचे फोटो, व्होकल मेसेज, लिखित संदेश, फोनद्वारे दररोज च्या वाचनाची माहिती दिली. यामुळे एकमेकांना प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमामुळे दररोज आध्यात्मिक वाचनाची सवय लागून सद्गुरू प.पू.परमात्मराज महाराज यांचे दिव्य विचार आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी सांगितले.


याप्रसंगी परमपूज्य परमात्मराज महाराजांनी वर्तेट पारायणाविषयी समाधान व्यक्त केले व म्हटले की “भरपूर मोठ्या संख्येने भाविक आध्यात्मिक ग्रंथ वाचनाकडे वळत आहेत, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याशिवाय पुष्कळशे भाविक हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठाच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सअप ग्रुप्सशी जोडले जात आहेत. ही सुद्धा फार चांगली बाब आहे. असे जोडले जाणे हे सर्व जातिधर्म सम्प्रदायमान्य अशा चांगल्या विचारांशी जोडले जाणे होय.”


महाराजांचे हे विचार ऐकून महाराजांच्या ग्रंथांचा व त्यांच्याशी संबंधित समाज माध्यमावरील मजकूराचा प्रचार प्रसार करण्याचा उपस्थित भाविकांनी पवित्र संकल्प केला.


परमपूज्य परमात्मराज महाराजांचे सर्वच ग्रंथ सर्वजातिधर्मपंथांमधील सर्वांनी वाचावेत असेच आहेत. यामधून वाचकांना अध्यात्म क्षेत्रातील विविध विषय समजतातच त्यासोबतच व्यवहारिक जीवनातही आपण कसे वागले पाहिजे, काय केले पाहिजे याचे ज्ञान होते. महाराजांनी सर्वच ग्रंथांमध्ये विज्ञान व अध्यात्म यांचा सुरेख संगम साधला आहे. या ग्रंथांमध्ये अध्यात्मशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अभियांत्रिकी, आण्विक भौतिकी इ. विविध शास्त्रांमधील दृष्टांत देऊन सर्व आवश्यक विषय समजावून सांगितले असल्याने सर्वच क्षेत्रातील वाचकांनी हे ग्रंथ अवश्य वाचावेत.
गुरुवार दि. १४ रोजी ग्रंथातील २१ वा (शेवटचा) महासर्ग पूर्ण झाल्याने पारायणपूर्तीनिमित्त अनेकांनी घरी अतिशय सुंदर रीतीने ग्रंथपूजा, नामजप, आरती, प्रसादवितरण इ. कार्यक्रम पार पाडले. हा उपक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्व भाविकांचे अभिनंदन करत पुढील काळात ‘परमाब्धि’, ‘सत्पोष’, ‘महोन्नय’, ‘रस्याव’, ‘तन्वास’, ‘शिप्रोत’ या ग्रंथांच्या वाचनाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथवाचन सेवेकरी मंडळातर्फे करण्यात आले.


या सामूहिक पारायणामुळे भाविकांमध्ये वाचन संस्कार, भक्तिभाव व आध्यात्मिक विचारांचे बीज अधिक रुजले असून, श्रद्धेचा आणि एकतेचा सुंदर सोहळा पहायला मिळाला आहे.


योगायोगाने वर्तेट पारायणसमाप्ती ही गुरुवार दि. १४/८/ २०२५ ला आली. त्यामुळे पुष्कळशे पारायणकर्ते आडी येथील श्रीदत्त देवस्थानात दर्शनाकरिता आले होते. सर्वांनी महाप्रसाद ग्रहण केला. पुणे येथील संगणक अभियंते श्री दिगंबर पाटील यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी श्री देवीदास महाराज, श्री नामदेव महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री समाधान महाराज, श्री मारुती महाराज, श्रीधर महाराज व आश्रमस्थ विद्यार्थीही उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!