कागल (विक्रांत कोरे):
कागल – निढोरी राज्यमार्गावर गोरंबे ता.कागल हद्दीतील वाघजाई घाटात पेटत्या कंटेनरचा थरार पहायला मिळाला. आगीत कंटेनरचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोवा येथून पंजाबकडे कंटेनर निघाला होता.केमिकल वाहतुक करणारा दिल्ली हुबळी रोडलाईन्सचा कंटेनर क्रमांकआर.जे.१४ जी.क्यू ८४५०,हा बुधवार (दि.6) रोजी सकाळी 9.00 वाजता गोरंबे ता.कागल येथील वाघजाई घाटात आला. धावत्या कंटेनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कंटेरच्या केबीनमध्ये अचानक आग लागली. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले . भयावह घटना पाहता रस्त्यावर इतरत्र वहाने थांबली. उपस्थित ग्रामस्थानी आगीच्या बंबाना फोन करून बोलावून घेतले. तासाभरात हमिदवाडा व कागल येथील आग्नीश्यामक गाडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनरमधून उडी मारली. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किट ने आग लागल्याने कंटेनरचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे.
आगीमुळे कागल – निढोरी राज्यमार्गावरील कांही काळ वाहतुक ठप्प झाली होती. कागल पोलिसांनी सदर घटनास्थळी धाव रस्त्याच्या दुतर्फा ठप्प झालेली वाहतुक सुरळीत केली.