मुरगूड ( शशी दरेकर )
: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रखर राष्ट्रवादाचा विचार दिला. शिक्षण आणि समाज यासाठी चतु:सूत्रीची संकल्पना मांडली. ती आजही प्रेरणादायी आहे.लोकांना संघटित करून त्यांच्यात स्वातंत्र्याची जागृती निर्माण केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखन साहित्यातून सामाजिक व्यथा मांडल्या. ते कुशल संघटक होते.
त्यांनी गिरणी कामगार चळवळीला भक्कम आधार दिला. शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक जागृती केली. असे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या,अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यदिन कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक प्राध्यापक अरुण गावकर यांनी केले.

यावेळी प्रा.आदिनाथ कांबळे , प्रा ऐश्वर्या धामोडकर, प्रा. शितल मोहिते. प्रा. सुप्रिया घाडगे .प्रा सौरभ देसाई , प्रा.रोहित सरनोबत प्रा. प्रकाश शिंदे, रवीना बावडेकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार डॉ.संदीप पानारी यांनी मांडले. सदर कार्यक्रमासाठी आनंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई, संस्था सचिव डॉ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.