कोल्हापूर, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करवीर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १८ तालुकास्तरीय रोजगार मेळाव्यांसाठी अंदाजित ९,००,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख फक्त) आणि कार्यालयीन स्टेशनरीसाठी अंदाजित ५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) असा एकूण ९,५०,०००/- (अक्षरी रुपये नऊ लाख पन्नास हजार फक्त) इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
सदर कामे कंत्राटी पद्धतीने पूर्ण करण्यासाठी, कोल्हापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या व विहित अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून दरपत्रकासह प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासस्थान, विचारेमाळ, कावळा नाका, कोल्हापूर यांच्या नावे दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळपर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त श्री. जमीर करीम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.