मुरगुडात नगरपालिकेच्या ‘अरी वर्क’ प्रशिक्षणाला महिलांचा उस्पूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड :’अरी वर्क’ प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी महिलांसमवेत तज्ञ प्रशिक्षिका विदुला  देवेकर मुरगूड नगरपरिषद मुरगूड (महिला व बालकल्याण विभाग व  दिनदयाळ आजीविका अभियान) मार्फत शहरातील महिलांसाठी १५ दिवसाचे मोफत आरी वर्क प्रशिक्षण देण्यात आले. सलग १५ दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत झालेल्या शहरातील दोनशे महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.  

Advertisements

     तज्ञ प्रशिक्षिका विदुला शरद देवेकर यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना आरी वर्कचे प्रकार व अन्य सविस्तर माहिती दिली. स्वागत रेश्मा चौगुले, प्रास्ताविक सुरेखा वडर तर सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.अंजली हजारे, मनाली शिंदे, स्नेहल आबिटकर यांनी मनोगते मांडली तृप्ती पाटील यांनी आभार मानले.

Advertisements

प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांचे मार्गदर्शन व पालिकेच्या कार्यालय अधीक्षक स्नेहल नरके, नगर लेखापाल मनाली शिंदे, लेखानिरीक्षक अंजली हजारे, महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी सुरेखा वडार, कर निरीक्षक तृप्ती पाटील, प्रकल्प अधिकारी सुनील पाटील, समुदाय संघटिकारेश्मा चोगले यांचे सहकार्य लाभले.
       

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!