मडिलगे ( जोतिराम पोवार ) –
अखंड महाराष्ट्रात शेतकर्यांची वीज बील थकीत असताना वाघापूरात महावितरण कडून सक्तीने वीज बील वसुलीसाठी कृषी मोटार पंपाची वीज तोडणी सुरू आहे .त्याच्या निषेधार्थ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.आज संपूर्ण गावातील वीज कनेक्शन तोडण्यात आली. यावेळी महावितरण च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी वाघापुरातील सर्व शेतकरी बांधव वाघापुर येथील मूख्य चौकात उपस्थित होते. यावेळी संग्राम दाभोळे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पाटील, सुनिल जठार,तानाजी कुरडे, शिवाजी गुरव, उपसरपंच संतोष बरकाळे यांची भाषणे झाली. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.