मयत विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, सासरच्यांवर गुन्हा दाखल

मुरगुड(शशी दरेकर): कागल तालुक्यातील चिमगाव येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आणि सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याने नवविवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, सन 2005 साली मयत हिचा हर्षद नावाच्या मुलगा पाच महिन्याच्या असतानाच बेड वरुन जमिनी वरती पडला होता. त्यावेळेस त्याच्या डोक्यात गाठ तयार झाली. हर्षदला या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता होती. त्यावेळेस मृत शुभांगी विश्वास लोंढे हिच्या उपचारासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून मागणी केली जात होती.

Advertisements

माहेरून पैशे आणण्याचा तगादा तसेच हर्षदच्या आजारावरून मृत शुभांगी विश्वास लोंढे हिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या छळाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

Advertisements

याप्रकरणी पोलिसांनी धोंडीराम विष्णू लोंढे(सासरा), विश्वास धोंडिराम लोंढे (पती), शांताबाई धोंडीराम लोंढे (सासू) आणि विलास धोंडीराम लोंढे (दीर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास मुरगुड पोलिस करत आहेत.

Advertisements

तारीख व वेळ: ३१/०५/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता.
गुन्हा दाखल: ३१/०५/२०२५ रोजी १६.१२ वाजता.
पोलिस ठाणे: मुरगुड पोलिस ठाणे, जि. कोल्हापूर.
कलम: भा.दं.वि. कलम ३०६, ४९८ अ, १०९, ३४.

Leave a Comment

error: Content is protected !!