
मुरगूड ( शशी दरेकर ):
कुरणी ता – कागल येथील मुलीबरोबर
प्रेमसबंध असल्याच्या कारणावरुन सौरभ भरमा काबळे ( निढोरी ता – कागल ) यास इंडिका गाडीतून कुरणी येथील कालवा रोडला असलेल्या एका शेडमध्ये नेले. तेथे जातीवाचक शिवीगाळ करीत त्यास विवस्त्र करून तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण तसेच अवघड जागेवर लाथेने मारहाण केली. यामध्ये सौरभ कांबळे हा जखमी झाला असून त्यास उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
याप्रकरणी प्रशांत नामदेव करडे (रा. मुरगूड ) , शिवप्रसाद शहाजी पाटील ( रा. कुरणी ता कागल ) व शुभम जीवन पाटील ( रा. कुरणी ता. कागल ) यांना मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . याबाबतची फिर्याद
विजय भरमा कांबळे (निढोरी ) याने मुरगूड पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
सौरभ भरमा काबळे ( निढोरी ता – कागल ) याचे
कुरणी ( ता – कागल ) येथील मुली बरोबर प्रेमसबंध असल्याच्या कारणावरुन दि. 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.15 च्या सुमारास मुरगूड नाका येथे सौरभ काबळे यास प्रशांत नामदेव करडे (रा. मुरगूड ), शिवप्रसाद शहाजी पाटील ( रा. कुरणी ता कागल ) व शुभम जीवन पाटील ( रा. कुरणी ता. कागल ) यांनी तु म्हाराचा आहेस, तुझी लायकी नाही. तु गावाच्या बाहेर राहतोस, तुझे घर आज पेटवणार अशी जातीवाचक शिवीगाळ केली. नंतर त्यास इंडिका गाडीमध्ये बसवुन कुरणी येथील कालवा रोडला असलेल्या एका शेडमध्ये नेले .तेथे जखमीचे कपडे काढून प्रशांत नामदेव करडे, शिवप्रसाद शहाजी पाटील यांनी सौरभला लोखंडी रॉडने पाठीत व डाव्या हातावर मारहाण केली. त्यामध्ये सौरभचा डावा हात फॅक्चर झाला असुन प्रशांत नामदेव करडे याने त्याच्या अवघड जागेवर लाथेने मारहाण केली. तसेच शुभम जीवन पाटील याने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी विजय भरमा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘ कलम 116-2025 भारतीय न्याय संहिता कलम 140(3), 118 (1)118 (2) ,352,115 (2)3 (5 ) सह अनुसुचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक अधि. 2015 में कलम 3 (1) ( r ) ( s ) 3 (2) (v) ( a )3 (2) (v) नुसार मुरगूड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहेत.