महात्मा गांधींना ( Mahatma Gandhi ) शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नाना पटोले

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi )यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Advertisements

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली आहे तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप त्या कालीचरण बाबाने केले आहे. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी.

Advertisements

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगभरातील अनेक देश आदर्श मानतात व त्यानुसार वाटचालही करतात परंतु आपल्याच देशातील काही लोक जाणीवपूर्णक त्यांच्याबद्दल अपप्रचार करतात, त्यांच्याबदद्ल अर्वाच्च भाषा वापरतात हे निंदनिय आहे.

Advertisements
AD1

1 thought on “महात्मा गांधींना ( Mahatma Gandhi ) शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नाना पटोले”

Leave a Comment

error: Content is protected !!