मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी लक्ष्मी नारायण संस्थेच्या सभासद अपघाती मयत वारसानां एक लाखाचा चेक वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्ण महोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखा मुरगूडकडील मयत कर्जदार कै. कलारीन संतान बारदेस्कर रा . मुरगूड यांच्या पश्चात कु. स्मिता संतान बारदेस्कर या वारसानां दि ओरीएन्टन इशो. कंपणी यांचेकडून मिळालेल्या चेकचे वितरण श्री. लक्ष्मीनारायण पत संस्थेच्या मुख्यकार्यालय येथे करणेत आले. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री . पुंडलिक नाना डाफळे यानीं केले.

Advertisements

चेक वितरण प्रसंगी सभापती किशोर पोतदार म्हणाले संस्था सभासद , कर्जदार यांचा विमा उतरवून अशा दुःखद घटना घडल्यानंतर त्यांच्या पश्चात वारसानां विम्याची रक्कम मिळवून देऊन त्यांचा दुःखभार हलका होत त्यानां आर्थिक मदत होते व ते दुःखातून सावरतात.

Advertisements

यावेळी चेकचे वितरण सभापती किशोर पोतदार उपसभापती दत्तात्रय कांबळे, जेष्ठ संचालक जवाहर शहा, व सर्व संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

सदर कार्यक्रमासाठी सभापती किशोर पोतदार , उपसभापती दत्तात्रय कांबळे , जेष्ठ संचालक जवाहर शहा , संचालक पुंडलीक डाफळे, दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर, संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत , तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी , सचिव मारूती सणगर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते . शेवटी उपस्थितांचे आभार काम्रेड बबन बारदेस्कर ( नगरपरिषद मुकादम ) यानीं मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!