मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी व सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्य साधून नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद लाभला.

सदर शिबीराचे अदघाटन मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे सभासद नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते झाले. शिबिरास १५५नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचार करणेत आले. यावेळी २० रूग्णांच्यावर आधुनिक पद्धतीने दुर्बिणीव्दारे मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. सदर रुग्णांची तपासणी नॅबचे डॉ . रविंद्र कदम निपाणी व त्यांच्या सहकारी यानीं केली.


सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक व संचालक माजी खासदार संजयदादा मंडलिक तसेच सभापती दत्तात्रय सोनाळकर, उपसभापती रविंद्र ढेरे, संचालक रामचंद्र भोपळे, युवा नेते विरेंद्र मंडलिक (भैया), एन. वाय. पाटील, प्रदिप चव्हाण, नारायण मुसळे, दत्तात्रय भोई, सौ. वैशाली मंडलिक, सौ. सविता कळांत्रे, कार्यकारी संचालक डी. एन. पाटील व सर्व शाखांचे शाखाधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.