मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता . कागल ) येथे सालाबादप्रमाणे हजरत गैबी पीर ऊरुस१५ जानेवारी ते १९ जानेवारी अखेर विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे. बुधवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक व रात्री ९ वाजता झी टॉकीज फेम, बीग बॉस फेम ह. भ. प. शिवलीलाताई पाटील (बार्शिकर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम, गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी भर ऊरुस, सकाळी ९ वाजता ऊरुस समितीतर्फै गलफ, नैवेद्य अर्पण, तसेच रविवार दि. १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता ” ऑर्केस्ट्रा वैभव डान्स मुझिकल नाईट ” यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
याचबरोबर बच्चेकंपनीसाठी मौत का कुआँ , सलाम्बो , ट्रॅगन ट्रेन , ब्रेक डान्स, आकाशी पाळणे , मिकी माऊस, जंपींग-जपांग, तिरका पाळणा, टोरा -टोरा तसेच एस्सेलवर्डमधील अनेक करमणुकीची साधने, खाऊ पदार्थाचे अनेक स्टॉल , आईसक्रीम स्टॉल हे गैबी देवस्थान परिसर व मराठी शाळा नं. १ पटांगणावर ( मुरगूड पोलिस स्टेशन समोर ) येथे भरविण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा सर्वानीं लाभ घ्यावा असे आवाहन ऊरुस समितीचे अध्यक्ष अमित भोई (सर ) , उपाध्यक्ष समाधान दरेकर व समितीच्या सर्व सदस्यानी केले आहे.