व्हनाळी(सागर लोहार): व्हनाळी तालुका कागल येथील श्री हनुमान सह. दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमन पदी हिंदुराव सुभाना जाधव यांची तर व्हा. चेअरमन पदी बाळासो निचिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडी माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. यावेळी माजी चेअरमन एम.टी.पोवार, संचालक श्रीपती वाडकर, पांडुरंग पाटील ,विश्वास पाटील, पांडुरंग कांबळे, बाजीराव वाडकर,सौ. इंदुबाई पालकर, श्रीम. अंजनी बल्लाळ सचिव गोपीनाथ वाडकर व सर्व कर्मचारी सभासद उपस्थित होते.