मुरगूड शहरामध्ये कुत्र्यांची दहशत !  थरकाप उडवणारा कुत्र्यांचा संचार !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात  कुत्र्यांचे कळपच्या कळप चक्क रस्त्यावरून संचार करताना दिसत आहेत. एकट्याने चालताना कुत्र्यांचा कळप अंगावर येत असल्याने व चावा घेत असल्याने नागरिकांचा थरकाप उडत आहे. निवडणूकीच्या रणधुमाळीत चक्क कुत्र्यानींच दहशत माजवली आहे.

Advertisements

          कधी नाही एवढी कुत्र्यांची बेसुमार संख्या मुरगूड शहरात वाढली आहे. गल्ली – बोळातून  व मुख्य रस्त्यावर कुत्र्यांचे कळपच्या कळप राजरोस फिरताना दिसतात . लहान पिलावळही मोठ्याप्रमाणात वाढली आहे . त्यामुळे रस्त्यावर माणसापेक्षा कुत्रीच जास्त दिसतात .

Advertisements

          भटक्या कुत्र्यांचा मोकाट  सुळसुळाट सर्वत्र होवू लागल्याने त्यांची दहशतच बसली आहे .  रस्त्यावरून जाताना कुत्र्यांचा कळप समोर आल्यास त्यांचा हल्ला होण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांना सावधपणेच जावे लागते. लहान बालकांना या कुत्र्यांपासून  मोठा धोका संभवतो. पिसाळलेल्या कुत्र्यापासून तर  बचाव करणे  महाकठिणच होवून बसते. वाहतूकीलाही कुत्र्यांचे कळप अडथळा करतात.

Advertisements

         मोटरसायकलच्या भुंकत गाडीचा पाठलाग करतात त्यामुळे अपघात होण्याचा संभव असतो . कुत्र्यांचा वाढलेला सुळसुळाट  कुणाच्यातरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही .

         गेली पाच वर्षे मुरगूड नगरपालिका सभागृहात कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेची बाब असल्याचे कबुल करत  कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावर एकमत होवूनसुद्धा आतापर्यंत कोणतीच ठोस कार्यवाही नाही . पालिका प्रशासनाने शहरातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा घाट घातला होता पण तो बारगळला . त्यावर कागदोपत्री खर्च पडला आहे कि काय ?  याचाही नागरिकांना संशय येवू लागला आहे .

             शहरात दहशत  माजवणाऱ्या व उच्छाद मांडलेल्या  कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास  नागरिकांना वेगळ्याच परिणामाला सामोरे जावे लागणार आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!