कागल (प्रतिनिधी): निरंजन दूध संस्था सौंदलगा (ता. निपाणी) या संस्थेच्या कार्याचा आदर्श इतर संस्थाने घ्यावा असे प्रतिपादन प्रा.सुरेश डोणे यांनी केले. ते संस्थेच्या दिवाळी बोनस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. विवेक माने होते.
प्रा. सुरेश डोणे पुढे म्हणाले की, निरंजन दूध संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा योगेश माने यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत निरंजन दूध संस्थेच्या सौंदलगा,लखनापूर, निपाणी या तिन्ही शाखांचा कार्यभारही त्या जबाबदारीने सांभाळत आहेत. सभासदांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे त्यांचे प्रामुख्याने लक्ष आहे. परिसरातील उच्चांकी दूध बोनस त्यांनी दिला आहे. त्याबद्दल उत्पादकांच्या वतीनेही त्यांचा सह पतिक सत्कार करण्यात आला.
निरंजन दूध संस्थेने म्हैस दर बोनस 15.50% व गायदर बोनस 6% इतका उच्चांक दर दिलेला आहे. म्हैस दूध बोनस महेश दूध मारुती भैरव परमकर (प्रथम), खंडू कोंडीबा महाडिक (द्वितीय), उत्तम राजाराम पाटील (तृतीय), गाय दूध बोनस श्रेयस सतीश चौगुले (प्रथम), राजेंद्र रघुनाथ शेळवाडे (द्वितीय), उत्तम राजाराम पाटील (तृतीय), फॅटनुसार बोनस सुधाकर आनंदा पाटील (प्रथम), जालिंदर ज्योतीराम पाटील (द्वितीय), तर अनिल धोंडीराम कोठवाळे (तृतीय) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.विवेक माने, डॉ. योगेश माने,संस्थेचे सेक्रेटरी-कृष्णात पाटील, संतोष माने, इंद्रजीत माने,जयश्री माने, सुनील कुर्ले,डॉ. सुधाकर पाटील, संजय भेंडुगळे,धनाजी कोठवाळे,विक्रम पाटील, उदय पाटील, युवराज कळंत्रे, गोरखनाथ कुंभार,अरुण कांबळे, ऋतिक हरेल, नानासो पाटील, मनोहर चौगुले आदी उत्पादक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवाजी किरळे व धनाजी पाटील यांनी केले. स्वागत पूजा माने हिने केले तर आभार प्रा.डॉ. संजय खोत यांनी मानले.