मुरगुडमध्ये अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न

मुरगूड  ( शशी दरेकर ) : मुरगुड शहरा नजीकच्या शाहूनगर वसाहतीतून पाणंद मार्गाने शाळेकडे जात असलेल्या दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा दोघा अज्ञातांनी प्रयत्न केला. मुलींनी प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर अज्ञातांनी तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी घडली.

Advertisements

पोलीस अज्ञातांच शोध घेत आहेत. शाहूनगर वसाहतीमधून दोघी शाळकरी मुली मंगळवारी १०.३० वा. च्या सुमारास शाळेला पाणंद रस्त्याने येत होत्या, दरम्यान काळा ड्रेस परिधान केलेला एक इसम अचानक उसातून बाहेर आला व तो मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करीत जवळ आला.

Advertisements

त्याचवेळी त्याने आपल्या अन्य साथीदारांशी कन्नड भाषेतून मोबाईलवर संपर्क साधला. याचवेळी तेथे मारुती व्हॅन घेवून दुसरा अज्ञात इसम आला. या व्हॅनमध्ये एका मुलीला ओढून नेत असताना दुसऱ्या मुलीने आरडाओरडा केल्याने त्यांनी पळ काढला. एका मुलीने एकाला दगड मारत आपली सुटका करून घेतली. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी तेथून मारुती व्हॅनमधून पळ काढला. त्या दोन्ही मुलींनी घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. या प्रकाराने मुरगूड परिसरात खळबळ उडाली आहे .

Advertisements
AD1

1 thought on “मुरगुडमध्ये अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न”

Leave a Comment

error: Content is protected !!