मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.
मुरगूड हे कागल तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ असलेले शहर असून मुरगूड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५७ गांवे येतात. त्याच बरोबर या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, ग्रामीण रूग्णालय इ. शासकीय कार्यालये कार्यरत आहेत.
मुरगूड व परिसरातील नागरिकांना आपल्या शासकीय कामासाठी कागल येथे जाण्याकरीता तब्बल ५० कि. मी. चा प्रवास करावा लागतो. यामूळे नागरिकांचा वेळ व पैसा नाहक खर्च होवून वेळ वाया जातो. यासाठी मुरगूड या मध्यवर्ती ठिकाणी अप्पर तहसिल कार्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
माजी नगरसेवक सुहास खराडे, जयसिंग भोसले, संदिप कलकुटकी, सर्जेराव पाटील, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक , आनंदा मांगले , सुनिल रणवरे , भगवान लोकरे, राजू भाट, मारुती कांबळे, दीपक शिंदे, अनिल राऊत, अक्षय शिंदे, राजेंद्र कांबळे, दिलीप कांबळे यांच्यासह मंडलिक गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मा. खासदार संजय मंडलिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुरगुड मध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू होण्याबाबत गेल्या महिन्यात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी आहे.
Fantastic site Lots of helpful information here I am sending it to some friends ans additionally sharing in delicious And of course thanks for your effort