मुरगूड ( शशी दरेकर ) : विशाळगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरचे अतिक्रमण पाहता गडाचे गडपण हरवत चालल्याची भावना मनामध्ये आल्यानेच भावनिक होत शिवभक्तांकडून घडलेले कृत्याची त्यांना कठोर शिक्षा देऊ नये त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसाठी मुरगुड मध्ये शिवभक्त समाजसेवक आणि मुरगूड शहरवासी यांनी मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे यांना निवेदन दिले.

यावेळी नागरिकांनी विशाळगडावर अतिरेकी यासीन भटकळ वास्तव्यास होता याची चौकशी करावी अशी देखील मागणी केली यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, दगडू शेणवी, ओंकार पोतदार, बाळासाहेब सूर्यवंशी, सुशांत मांगोरे, संकेत शहा, तानाजी भराडे, मयूर सावर्डेकर, संकेत भोसले, रणजीत मोरबाळे, अजित मेंडके , संग्राम साळोखे, राजू चव्हाण, मंदार जाधव, पवन तेलंग ,राहुल कांबळे यांच्यासह शिवभक्त आणि शहरांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?