”गावतलावाच्या मध्यभागी शंभरफुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार “
मुरगूड ( शशी दरेकर ) : यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून मुरगूड येथिल अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली .
येथील प्राचीन कालातील अंबाबाईचे मंदीराचा ५ कोटी खर्चातून नुकताच जिर्णोध्दार झाला आहे . जानेवारी २०२ ३ मध्ये मुरगूड नगरपरिषद मार्फत राज्यशासनाकडे मंदीर व परिसर विकसित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता . त्याचा माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठपुरावा केला होता .त्यास अखेर मंजूरी मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले .
एक उत्तम तीर्थक्षेत्र म्हणून मुरगूडचे अंबाबाई मंदीर नावारुपाला येणार आहे . मंजूर निधीतून मंदीर परिसराचे सुशोभीकरण व शेजारच्या गावतलावचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे . गावतलावाच्या मध्यभागी शंभर फुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे . व परिसरात बगीचा . कारंजे व हायमास्क दिवे लावले जाणार आहेत. हा परिसर पर्यटनाचे आकर्षण ठरणार आहे .
मंजूर तीन कोटीमध्ये राज्य शासनाकडून २ कोटी २३ लाख नगरपरिषद व देवस्थान कमिटी यांच्याकडून ७७ लाख निधीची तरतूद होणार आहे.
लवकरच अंबाबाई मंदीर परिसर विकास कामास प्रारंभ होणार आहे . निधी मंजूरीसाठी व कामाच्या प्रशासकिय मंजूरीसाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह पालकमंत्री ना हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आबिटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले . ग्रामदैवत अंबाबाई मंदीर विकास कार्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे .
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.