मुरगूडच्या श्री व्यापारी पतसंस्थेतर्फै स्कूल बॅगेंचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल आपुलकीची व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारी ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने होतकरू व गरीब शालेय विद्यार्थानां स्कूल बॅगेंचे वाटप करण्यात आले .निमित्य होतं संस्थेच्या रौप्यमहोत्सवात पदार्पन केल्याचं.

Advertisements

यावेळी आश्रम शाळा चिमगांव, मुरगूड येथिल जीवन शिक्षण विद्यामंदिर, शिवाजी विद्यामंदिर, कन्याशाळा, विजयमाला गर्ल्स हायस्कूल, शिवराज विद्यालय , शिवराज ज्यू. कॉलेज व मुरगूड विद्यालय मुरगूड अशा शाळेतील विद्यार्थी , विद्यार्थिनीनां स्कूल बॅगांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , संचालक किशोर पोतदार यानीं संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

Advertisements

याप्रसंगी व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संस्थेचे संचालक सर्वश्री साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , हाजी धोंडिराम मकानदार , प्रशांत शहा, नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर, निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव , संस्थेचे कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर , संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Advertisements
AD1

2 thoughts on “मुरगूडच्या श्री व्यापारी पतसंस्थेतर्फै स्कूल बॅगेंचे वाटप”

Leave a Comment

error: Content is protected !!