हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
मुरगुड ( शशी दरेकर ) : विशाळगड मुक्ती आंदोलन संदर्भात आणि हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबन प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड येथील शिवतीर्थ येथे निदर्शने करण्यात आले . विशाळगडावरील 1886 च्या बॉम्बे गॅझेट नुसार गडावरील दर्गा ठेवून वाढलेले इतर अतिक्रमण निघावे,गडावरील इतर अतिक्रमण व ऐतिहासिक विहिरीवर असणारे अतिक्रमण तात्काळ हटवावे ,वनविभाग च्या हद्दीतील पार्किंगचे अतिक्रमण हटवून तेथील जागा रिकामी करावी , गडदेवता वाघजाई देवी मंदिराचे ऐतिहासिक स्वरूपाचं बांधकाम होण्यासाठी भरीव निधी मिळावा , छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिका राणीसाहेब यांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा , गडावर लागू करण्यात आलेली पशु पक्षी हत्या बंदी कायमस्वरूपी ठेवून त्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात यावेत.
तसेच हडपसर येथील भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांना देण्यात आले. यावेळी बोलताना ओंकार पोतदार म्हणाले की ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विशाळगड किल्ला सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे . गडावरती दारू ,पार्टी ,पशू पक्षी हत्या , कचरा यांच्यामुळे गडाचे पावित्र्य कमी होत आहे त्यामुळे गडावरील नंतरच्या काळात झालेली सर्व अतिक्रमणे काढली पाहिजेत तसेच गडावर कायमस्वरूपी पशुपक्षीहत्या बंदी झाली पाहिजे
तसेच हडपसर येथे दिवसाढवळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली जर राजरोसपणे असे प्रकार घडत असतील तर या प्रकारांना पाठीशी कोण घालत आहेत याची माहिती घेतली पाहिजे तसेच असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. असे प्रकार पुन्हा घडल्यास शिवप्रेमी शांत बसणार नाहीत.
यावेळी सर्जेराव भाट, जगदीश गुरव, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, संकेत शहा, रणजीत मोरबाळे, शिवाजी चौगुले, आनंदा रामाने, सुरज मोरबाळे, शिवाजी रावण, अजित गुरव, महादेव वागणेकर, प्रकाश पारिशवाड यांच्यासह शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!