तब्बल २२ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा
कागल(विक्रांत कोरे) : विद्यामंदिर करनूर (ता. कागल) या जिल्हा परिषदेच्या सरकारी प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी वर्गातील सन २००१-०२ या सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल २२ वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा रंगला. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक के.डी.पाटील हे होते.
प्रारंभी रणजीत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना के.डी.पाटील म्हणाले, आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी प्रवृत्त करा. व्यसनापासून दूर ठेवा. वडीलधाऱ्या मंडळींचा मानसन्मान राखा. पती-पत्नी विचाराने आपला संसार फुलवण्यासाठी प्रयत्नशील राहा. एकमेकांचे सुखदुःखे एकमेकांना सांगा. त्याच्यातून अडचण आल्यास योग्य मार्ग निघू शकतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा या कार्यक्रमामुळे सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रा.पुनम बेडगे, युवराज पाटील यांनीही आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत गंमतीदार किस्से सांगितले. यावेळी अमोल चौगुले, रविंद्र कांबळे, अक्षय पाटील, सागर कांबळे, विनायक चौगुले, अविनाश कांबळे, राहुल नलवडे, सिद्धार्थ कांबळे, दत्तात्रय कोल्हापूरे, विजय कांबळे, आसिफ मुल्ला, संदीप नलवडे, सुप्रिया चौगुले, आसमा मुल्ला, वर्षा कांबळे, अनिता नलवडे, स्वाती पोकळे, मेघा दळवी, वनिता पाटील, आरिफा शानेदिवाण, आस्मा नायकवडी, स्वाती आवटे, मीनाक्षी खापणे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्वप्निल चौगुले यांनी आभार मानले.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.