दोन डोस व आरटी- पी सी आर ची मागणी
कागल( विक्रांत कोरे):
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार दूधगंगा नदी वरती शिथिल करण्यात आलेली तपासणी पुन्हा कडक करण्यात आली आहे. आर टी-पीसी आर व दोन डोसच्या रिपोर्ट ची सक्ती करण्यात आली आहे.हा रिपोर्ट ज्यांच्याकडे नसेल त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही.
दिवाळीपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती दूधगंगा नदीवर कर्नाटक सरकारने वाहनांकडून आर टी – पी सी आर ची सक्ती शिथिल करण्यात आली होती. पुन्हा रविवार पासून बेंगलोर शहर व धारवाड येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने ही तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वाहनधारकांकडून दोन डोस व आर टी – पी सी ची सक्ती करण्यात आली आहे. ज्या वाहनधारकांकडे आर टी – पी सी आर रिपोर्ट नसेल त्यांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच- लांब रांगा लागत आहेत. शितील करण्यात आलेली तपासणी पुन्हा कडक करण्यात आल्यामुळे वाहनधारकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
आजरा, गडहिंग्लज, उत्तुर व चंदगड तसेच स्थानिक प्रवाशांचे ओळखपत्र पाहून त्यांना प्रवेश दिला जात आहे. तपासणी दरम्यान वाहनधारक व पोलीस यांच्यात वादाचे प्रकार घडत आहेत.