करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी मोहन सातपुते व उपाध्यक्षपदी विजय कदम तर सचिवपदी संजय वर्धन व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी  याची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :
करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी  मोहन सातपुते (दै.लोकमत) विजय कदम(दै.लोकमत)  तर सचिवपदी संजय वर्धन  (दै.पुण्यनगरी) व खजानिसपदी राजेंद्र सूर्यवंशी (एसपीएन न्यूज) याची एकमुखाने निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष  पत्रकार संतोष माने हे होते.

Advertisements

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग संलग्न असलेल्या गांधीनगर पूर्व व गोकूळ शिरगाव पूर्व भागातील २५ गावातील विविध दैनिकाचे पत्रकार ,वार्ताहर ,इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन करवीर पूर्व पत्रकार संघ स्थापन केला आहे.गांधीनगर येथील सिधी सेंट्रल सभागृह  येथे  निवड समितीची बैठक पार पडली.

Advertisements

या निवडीप्रसंगी  जेष्ठ पत्रकार दौलत कांबळे(दै.पुढारी) 

Advertisements

अनिल उपाध्ये,नंदकुमार कांबळे (बी न्युज), डॉ.प्रवीण जाधव (दै.सकाळ),संतोष माने( तरुण भारत),राहुल मगदूम(न्युज २४ मराठी),प्रा.सुरेश मसुटे( दै.पुढारी)मालोजी पाटील(दै.तरुण भारत),अनिल निगडे(सिंधुदुर्ग समाचार),यांच्यासह 

आनंद  गुरव,प्रकाश पाटील (दै.पुढारी) दै.पुण्यनगरीचे प्रमोद  ढेकळे,विशाल घुले,बाबासाहेब  नेर्ले ,(लोकमत)  गजानन  रानगे(स्वतंत्र प्रगती)  राजेंद्र शिंदे( एस पी एन न्युज),  याची उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रवीण जाधव,यांनी तर मनोगत मावळते अध्यक्ष संतोष माने,राजेंद्र शिंदे,यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.सुरेश मसुटे व आभार बाबासाहेब नेर्ले यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!