मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव ता .कागल येथे सर्प मित्र रघुनाथ बोडके यांनीअतिविषारी असणारा कोब्रा नाग साप पकडला आहे.नंतर त्यास जंगलात सोडून देण्यात आले.
भडगांव ता .कागल येथील शामराव पाटील यांच्या गोठ्यामध्ये हा किंग कोब्रा जातीचा आल्याची कळताच साऱ्यांचीच पाचावर धारण बसली. कुरणी तालुका कागल या गावचे सर्पमित्र रघुनाथ बोडके यांनी पकडला व त्याला त्याच्या अधिवासामध्ये सोडण्यात आले. भर उन्हात दुपारी साडेबाराच्या दरम्याने हा सर्प गोठ्यामध्ये पकडला गेला.
आजपर्यंत सुमारे साडेचार हजार वेगवेगळ्या जातीचे साप रघुनाथ बोडके यांनी लोकांच्या वस्तीमध्ये आलेले पकडून त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये एक सामाजिक कार्य व भूतदया या भावनेने करत आहेत . रात्री अप रात्री कोणत्याही वेळेला त्यांना फोन आल्यानंतर ते लगेच सर्प धरण्यासाठी जातात व त्याला अधिवासात सोडण्याचे काम करतात या कामाबद्दल त्यांना अनेक सामाजिक संघटनांच्या कडून पुरस्कारही प्राप्त झाले आहेत .