मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रीय सणाची तयारी सर्वच करीत असतात . मग स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासताक दिन असो. पोलिस, शिक्षक, सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि विद्यार्थी यांची तयारी चार दिवस आधी पासून सुरू असते. शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांचे समोर ध्वजारोहणासाठी पोल रोवणे, तिरंगा ध्वज ईस्त्री करून आणणे या कामा बरोबर विद्यार्थी विद्यार्थिनीची गणवेश खरेदी करणे, कापड असेल तर गणवेश शिवून घेणे, कपडे इस्त्री करणे, डोक्यात माळण्यासाठी फुले गजरे खरेदी करणे, या कामामधे सारे व्यस्त असतात ‘ अशावेळी येथील शिवराज विद्यालयाचे शिक्षक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांची मात्र वेगळीच धावपळ सुरू असते.
ते गेली ३१ वर्षे शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून गणवेश वाटप करतात . शाळेतील सह काऱ्यांच्या मदतीने अशा विद्यार्थाचा शोध घेणे आणि त्या विद्यार्थ्यांना कपडे वाटप करणे या कामामध्ये ते व्यस्त असतात.
या वर्षी ही त्यांच्या कडून येथील शिवराज विद्यालय मुरगूड व विजयमाला मंडलिक गर्ल्स स्कूल येथील ३० विद्यार्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जय शिवराय एज्यु. संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत, शिवराजचे प्राचार्य पी डी माने, विजयमालाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस बी पाटील, उपमुख्याध्यापक रविंद्र शिंदे , पर्यवेक्षक एस एम कुडाळकर, एस एन् आंगज , यु बी पाटील, ई व्ही आरडे , व्ही बी खंदारे ,ए एम चौगले, एस एस मुसळे, के डी कुदळे , एस एस सुतार तसेच सर्व सौ.एस् जे कांबळे, एस डी देसाई , शोभा पाथरवट, सुरेखा माने, अवंतीका बावडेकर,जी एस डवरी, लता सारंग ,प्रियांका भारमल, ऋतुजा बिरंबळे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनीं उपस्थित होते .
श्री सुर्यवंशी हे पर्यावरणवादी विचार सरणीचे असून त्यांनी आतापर्यंत त्यांनी वनश्री मोफत रोपवाटीकेच्या माध्यमातून ४ लाख २० हजार रोपांचे मोफत वाटप केले आहे. वृक्षरक्षाबंधन , परीसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई पेरणी , वृक्षारोपण , पर्यावरण संवर्धनाबाबत व्याख्याने देणे, तसेच दिपावली निमित ऊस तोडणी व खुदाई कामगार भागिनींना भाऊबीज प्रसंगी साडी फराळ ओवाळणीचा कार्यक्रम, संत गाडगेबाबा पुण्यदिना निमीत उपेक्षित कष्टकऱ्यांचे सत्कार व थंडीच्या दिवसात उघड्यावर असणा ऱ्या निराधार निराश्रीतांना ब्लँकेटचे वाटप असे उपक्रम ते स्वखर्चाने प्रतिवर्षी राबवित असतात . अनेक पक्षांनाही त्यांनी जीवनदान दिले आहे. या कार्यामुळे ते झाडमाया, निसर्गमित्र, वृक्षमित्र, पक्षीमित्र व कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.