कागल मध्ये सभासदांना शेअर्स कार्ड वाटप
व्हनाळी – ता. 25 : माझ्यावर आणि माझ्या कर्तुत्वार प्रचंड विश्वास दाखवत मोलमजूरांपासून ते सर्वसामान्य शेतक-यांनी शेअर्स खरेदी केले त्यामुळेच अतिशय खडतर प्रवासात देखील श्री अन्नपुर्णा शुगर कारखाना उभा राहू शकला त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबर सभासदांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले.
कागल येथे श्री अन्नपुर्णा शुगर च्या सभासदांना शेअर्स कार्ड वितर कार्यक्रम प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी कागल शहरातील सभासदांना शेअर्स कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
श्री घाटगे पुढे म्हणाले, कारखाना प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत असून योग्य व्यवस्थापन केल्यामुळे भ्रष्टाचाराला श्वास देखील घ्यायला वाव ठेवलेला नाही. परमेश्वर कधीही माझ्या बाजूने उभा राहिला नाही परंतू मानव रुपी परमेश्वर कार्यकर्त्यांच्या रूपात नेहमीच माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेत हे मोठे समाधन आहे. कारखाना उभारणीत नामदार मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. सभासद रक्कमही 10 हजार रूपयेच राहिल त्यामध्ये कोणतीही वाढ करणार नाही. अन्नपुर्णा कर्जमुक्त झालेनंतर सभासदांना परतावा देणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी धनराज घाटगे,गंगाधर शेवडे,बाळासो पाटील,दत्ता सावंत यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास संचालक शिवसिंह घाटगे, सुभाष करंजे, शिवराज भरमकर, विश्वास करिकट्टे, पवन पाटील, प्रकाश बोभाटे, बापू घाटगे, अरूण तोडकर, अरूण निंबाळकर, विनायक उपाध्ये आदी उपस्थित होते. स्वागत सागर आंबी यांनी तर आभार सागर लोहार यांनी मानले.