मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व्होकेशनलचे माजी विभागप्रमुख प्रा.एस.एन.अंगज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह मा. अण्णासो थोरवत हे होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.डॉ.टी.एम.पाटील यांनी केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कुंभार सर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे कोण्या एका जातीचे नसून आपणच आपल्या सोयीने आपल्या महापुरुषांना वाटून घेतले आहे. खरे तर बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांच्या विचारांवर आपली वाटचाल केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उंदरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा. विष्णू पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा. उदय शेट्टी, प्रा.सुनिल मंडलिक, प्रा. जी. के. भोसले, प्रा.डॉ.उदय शिंदे, प्रा.डॉ.एम.एस.पाटील, प्रा.डॉ.के.एस.पवार, ग्रंथपाल प्रा.टी.एच.सातपुते, प्रा.डॉ.एस.बी.पोवार, प्रा.डॉ.ए.डी.जोशी, प्रा.एस.ए.दिवाण, प्रा. विनोद प्रधान, प्रा.डी.व्ही.गोरे, प्रा.डॉ.गुरुनाथ सामंत,प्रा.दयानंद कांबळे, प्रा. तेजस्विनी कांबळे तसेच सुनिल कडाकणे, सतिश खराडे, सुरक्षाधिकारी संग्राम भोसले, सदाशिव गिरीबुवा, सर्व प्रशासकीय सेवक व विदयार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी प्रा. सुशांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन ग्रंथालय परिचर बस्तवडेचे मा.सरपंच साताप्पा कांबळे यांनी केले.