उपोषणाचा तिसरा दिवस.. तब्बेत खालावली
मुरगूड ( शशी दरेकर ) – मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुदाळतिट्टा येथे गेले चार दिवस साखळी उपोषण सुरू आहे. यामध्येच बोरवडे ता. कागल येथील 24 वर्षीय युवक ओंकार सागर चव्हाण याने आमरण उपोषण सुरु केले आहे. ओंकार चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्याची तब्येत खालावली आहे. बीपी वाढला आहे.पण याची दखल कोणीही घेतली नाही.
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जय भवानी जय शिवाजी, आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ,आमचा लढा मराठा आरक्षणासाठी, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविन्यासाठी आशा घोषणा देत या ठिकाणी साखळी उपोषण सुरूच आहे.
राधानगरी, भुदरगड ,कागल, करवीर तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या मुदाळतिट्टा या ठिकाणावर हे उपोषण सुरू असल्यामुळे ये जा करणारा प्रवासी वर्ग या साखळी उपोषणात सहभागी होताना दिसत आहे.मुदाळतिट्टा व्यापारी असोसिएशन,बोरवडे, मुदाळ ग्रामपंचायत,अन्य संघटना,अन्य समाजातील बांधव उपोषणाला पाठिंबा देत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुदरगड तालुक्यातील कार्यक्रर्तेही सहभागी झाले आहेत.
विनोद वारके, बबन पाटील, विनायक जगदाळे, तुषार फराकटे (ठाकूर), महादेव साठे, गुंडू साठे, सुनील साठे, अशोक पाटील, प्रथमेश जोंधळे, हर्ष चव्हाण, मनोज चव्हाण, बबन खाडे, सुरेश यादव, राहुल पाटील, अमोल पाटील, पांडू खाडे, विकास डफळे, , मिलन फराकटे, सुशांत जोंधळे, भिवा बलगुडे, अक्षय वारके, किशोर चौगले, महेश बलगुडे ,रोहित फराकटे साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.