मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात 6 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे उदघाटन पुणे येथील सारथीचे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. विलास पाटील यांच्या शुभहस्ते व जय शिवराय सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड .वीरेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन समारंभ होणार आहे.
या स्पर्धेचे विषय …नवे शैक्षणिक धोरण 2020 : ‘वास्तव आणि आभास’ जनसामान्यांचे लोकनेते : खासदार सदाशिवराव मंडलिक निसर्ग कवी ना. धों. महानोर. भारताची यशस्वी अवकाश झेप: चांद्रयान ३ ,डाॅ.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील युवा भारताची दशा आणि दिशा ,हे स्पर्धेचे विषय असून प्रथम क्रमांकासाठी पारितोषिके रुपये 5001 चषक व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक साठी 3001 चषक व प्रमाणपत्र ,तृतीय क्रमांक 2001 चषक व प्रमाणपत्र ,उत्तेजनार्थ 701 चषक व प्रमाणपत्र अशी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत,तरी महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय ,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध विभाग यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.अर्जुन कुंभार व या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ.शिवाजी होडगे यांनी केले आहे.
या स्पर्धेचे हे 22 वे वर्ष आहे, मंडलिक साहेबांच्या जयंती निमित्त 5 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी १०वा रानभाज्या प्रदर्शन पाककला स्पर्धा व तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेचे उदघाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगूड या संस्थेच्या विश्वस्त माननीय सौ . वैशाली संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते होणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक मुरगूड पोलीस स्टेशन माननीय गजानन सरगर हे उपस्थित राहणार आहेत तरी या स्पर्धेमध्येही महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घ्यावा असे आवाहनही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ,अर्जुन कुंभार यांनी केले आहे.