मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मुरगुड यांच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुरगूड मध्ये ग्रामीण रुग्णांना फळे वाटप व शिवाजी विद्यामंदिर शाळा नंबर 2 या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
मुरगुड कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने आज महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता मोहीम व मंगळवार रोजी रूग्णाना फळे वाटप मधुकर आबाजी कुंभार यांच्या हस्ते व शालेय वाटप संस्थेचे सेक्रेटरी दत्तात्रेय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी हसन शिकलगार युवराज सूर्यवंशी प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी युवराज शिंदे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर मोरे. सुनील शेलार, शिवाजी विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष विजय मेंडके, पांडुरंग मुद्दाम यावेळी उपस्थित होते तर स्वागत मकरंद कोळी यांनी केले तर आभार युवराज सूर्यवंशी यांनी मानले.