बातमी

पैशाचा पावसाच्या नादात ४३ लाखाला गंडा

कागल( विक्रांत कोरे) : पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून भानामतीचा प्रकार केला. तळ घरात पुजा-आर्चा केली. आणि रुपये 43 लाख 22 हजार रुपयाची फसवणूक करून गंडा घातल्याचा प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे घडला आहे . यातील सात आरोपी पैकी चार आरोपींना अटक केली असून ,तीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

                कागल पोलीस ठाण्यात आनंदात ढाफळे राहणार सावर्डे खुर्द तालुका कागल याने तक्रार दाखल केली आहे. संतोष हिंदुराव लोहार वय वर्षे 36 राहणार म्हाकवे ,तालुका -कागल, धोंडीराम उर्फ रामा गोपाळ पवार व 54 राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल ,धोंडीराम रामा माळी वय वर्षे 45 राहणार नरवाडी तालुका- मिरज जिल्हा सांगली ,यशवंत राजाराम पाटील वय वर्षे 52 राहणार केळोशी तालुका गगनबावडा ,जिल्हा कोल्हापूर अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. अवधूत लोहार ,राहणार -कापशी तालुका -कागल ,भाऊ देव भाऊसो चव्हाण, राहणार -रंकाळा कोल्हापूर, राहुल मगर या तीन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत.

         कागल पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार
     कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तारीख 28 जानेवारी 2024 रोजी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे राहते तळघरात ठीक ठिकाणी पुजाराच्या केली घराची जागा बाधिग आहे अशी वेगवेगळे कारणे सांगितली तर घरात भानामतीचा प्रकार केला त्यानुसार पैशाचा पाऊस पडणार असे सांगितले.

आरोपींनी वेळोवेळी रुपये 43 लाख 22000 घेतले परंतु पैशाचा पाऊस काय पडला नाही. तगादा लावला म्हणून  आरोपीनी तक्रारदारास पत्नीस धमकी दिली म्हणून कागल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक लोहार हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *