सिद्धनेर्लीत हृदयद्रावक घटना: नारळाचे झाड घरावर कोसळून १० वर्षीय बालकाचा मृत्यू

कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका घराच्या छतावर सुकलेले नारळाचे झाड अचानक कोसळल्याने झालेल्या अपघातात १० वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. आयुष चौगुले असे या मृत बालकाचे नाव आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धनेर्ली गावातील एका घरावर जवळच असलेले जुने आणि वाळलेले नारळाचे झाड अचानक उन्मळून पडले. झाड थेट घराच्या छतावर आदळल्याने छताचा काही भाग कोलमडला.

Advertisements

या अपघातावेळी घरात उपस्थित असलेला १० वर्षांचा आयुष गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या अचानक घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण सिद्धनेर्ली गावावर शोककळा पसरली असून, चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता झाडाचा मोठा बुंधा घराच्या छताला तोडून आत पडल्याचे दिसून येत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!