युवकांनी व्यसनापासून दूर राहावे:- सा . पो . नि . ज्ञानदेव वाघ

मुरगूड ( शशी दरेकर ) – युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. ‘आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी निकोप विचार आणि  शरीरयष्टी असली पाहिजे.’ असे मत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सा. पो. नि. ज्ञानदेव वाघ यांनी मांडले. ते पद्मश्री ” डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालय, ” गगनबावडा येथे  “आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ “विरोधी दिनानिमित्त* घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

Advertisements

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. टी.एम.पाटील म्हणाले की, ‘जागतिक स्तरावर अमली पदार्थाची निर्मिती आणि त्याचे सेवन हा गंभीर प्रश्न बनलेला  आहे. पैशाचा अपव्यय आणि शारीरिक हानी टाळण्यासाठी तरुणांनी व्यसनमुक्त  रहाणे व त्याबाबतची चळवळ नेटाने चालवणे आवश्यक आहे.’ याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी प्रा ए.एस. कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Advertisements

         सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश देसाई व सचिव डॉ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. सुप्रिया घाटगे यांनी तर, आभार प्रा. सौ. राजश्री येडके यांनी मांडले .सूत्रसंचालन ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य एच. एस. फरास यांनी केले .यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

2 thoughts on “युवकांनी व्यसनापासून दूर राहावे:- सा . पो . नि . ज्ञानदेव वाघ”

Leave a Comment

error: Content is protected !!