सुळकूड (सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील युवा उद्योजक ओंकार सदाशिव घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी दिपावली निमित्त सुळकूड मधील सर्व ग्रामस्थांना घाटे उद्योग समूहाच्या वतीने भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. युवा उद्योजक ओंकार घाटे यांची पुणे शहरात घाटे कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आहे.
बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यातआले आहे.
युवा उद्योजक ओंकार घाटे यांनी आपल्या गावामध्ये सामाजिक जाणिवेतून दिपावली निमित्त भेटवस्तूचे वितरण केले. याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम देखील त्यांनी गावांमध्ये राबविले आहेत त्यांच्या या सामाजिक जाणीव बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी बाळासाहेब माने, सागर माने, कृष्णात परीट, दयानंद स्वामी, सिद्धेश्वर स्वामी, अजय स्वामी, अमर माने, महेश बेंनाळे,सतीश पाटील (चंदाप्पा), बाळु माने व आधार ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.