कागल(प्रतिनिधी) : द कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. प्रताप ऊर्फ भैयासाहेब माने यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वाय. डी. माने कॅम्पसच्या वतीने ‘योगा से होगा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी संपन्न होणार आहे.
Advertisements
समाजात आरोग्याप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात संस्थेचे सुमारे १००० विद्यार्थी आणि २०० शिक्षक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त कागल शहरातील नागरिकही या सामूहिक योगसाधनेत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Advertisements

कार्यक्रमाचा तपशील:
- स्थळ: शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड जवळ, कागल.
- वेळ: सकाळी ६:२० ते ८:०० वाजेपर्यंत.
- आयोजक: वाय. डी. माने कॅम्पस, कागल एज्युकेशन सोसायटी (KES).
या सामाजिक उपक्रमात कागलमधील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कॅम्पस डायरेक्टर श्रीमती शिल्पा जी. पाटील यांनी केले आहे.
AD1