पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या इतिहासात मानवाचा प्रवेश हा सर्वात शेवटी मानला जातो.
जसे झाडांना त्यांचे परागीभवन, बियांचे वहन करण्यासाठी कीटक, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांची आवशकता असते आणि हे काम करण्याच्या बदल्यात पशु, पक्षी, कीटक यांना अन्न आणि निवारा झाडांकडून पुरविला जातो. झाडे, झुडपे, गवत हे अन्नसाखळी मधील प्राथमिक घटक आहेत त्यावर तृण भक्षक प्राणी आणि तृणभक्षक प्राण्यांवर मांस भक्षक प्राणी गुजराण करत असतात.

या परीसंस्थेत समतोल राखण्याचे काम निसर्ग स्वतः करत असतो. ज्या प्रमाणे या पृथ्वीतलावर सजीव सृष्टी साठी अनुकूल वातावरण कायम राहण्यासाठी वनस्पती महत्वाच्या आहेत तेव्हडेच इतर पशु पक्षी देखील महत्वाचे आहेत.
खालच्या स्तरातील सर्व सजीवांची काळजी घेणे ही सर्व अन्नसाखळ्या च्या वरच्या स्तरात असणाऱ्या मानवाची जबाबदारी आहे. अन्न साखळीच्या पिरॅमिड मधील खालचा घटकच जर निखळला तर त्याच्या शिखराचे स्थान अबाधित राहू शकत नाही.
ही जैव विविधता जोपासण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी काही भरीव करण्याबरोबरच या परीसंस्थेत हस्तक्षेप टाळण्याची खरी गरज आहे. निसर्गाची हा समतोल राखण्याची त्याची स्वतःची पद्धती आहेत गरज आहे फक्त हस्तक्षेप टाळण्याची.
चला आज या जैव विविधता दिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करू की जैव विविधता टीकविण्यासाठी काही विधायक काम करू आणि ते जरी जमले नाही तरी आपल्या हातून असे कोणतेही विध्वंसक काम होणार नाही की ज्यामुळे या परीसंस्थेला आणि पर्यायाने जैव विविधतेला हानी होणार नाही याची काळजी घेऊ. सर्वांना आजच्या जागतिक जैव विविधता दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
वन्यजीव संरक्षन आणि संवर्धन संस्था गडहिंग्लज