आरोग्य

जागतिक एडस दिन

१९८८ पासून १ डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एडस दिन साजरा केला जातो या निमित्य एडस या आजारासंबंधी जागरुकता वाढवणे, एडस या साथीच्या संसर्गाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एच. आय. व्ही. विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एडस हा रोग हयुमन इम्युनो डेफिशियन्सी बायरस (एच. आय. व्ही.) व्दारे होतो. विषाणू संसर्गामुळ रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरते मुळे बाधा झालेल्या रोगाचा समुह म्हणजे एडस होय. A= Acquired ओढविलेला मिळालेला1 = Immuna- रोग प्रतिकार शक्ती, D= Deticienly कमतरता नष्ट होणे, S= Syndrome लक्षणांचा समूहएच. आय. व्ही. शरीरातील रोगप्रतिकार पेशी नष्ट करतो किंवा त्याचे नुकसान करतो. व्याप्ती : इस १९८१ मध्ये अमेरीकेत सर्वप्रथम एडस या रोगाची नोंद झाली असून आज हा रोग जगभर आढळतो, २०१७ पर्यंत एडस मुळे जगभरात २.८९ कोटी ते ४१.५ कोटी लोकांचा मृत्यु झाला आहे आणि अंदाजे ३.६७ कोटी लोक एच. आय. व्ही. सह जगत आहे.

काय आहेत लक्षणे

१) एडस ची पहिली लक्षण म्हणजे इन्फ्लूएंसा ( फल्यू) सारखी लक्षणे किंवा सुजलेल्या ग्रंथी असू शकतात, परंतु काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत दोन किवा तीन महिन्यानंतर लक्षणे दिसू शकतात, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाच्या अल्सर, डोकेदुखी, ताप, तुख्यता: मानेवर सुजलेल्या लिम्फ ग्रंथी, सांधे दुखी, अतिसार रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे असू शकतात एका महिन्यात शरिराच्या वजनाच्या १० टक्क्या पेक्षा जास्त वजन कमी होणे. एखादया व्यक्तीस अनेक मार्गानी एच आय व्ही/एडसची लागण होते.

रक्त संक्रमण :- काही प्रकरणामध्ये रक्त संक्रमणाव्दारे व्हायरस संक्रमित केला जाऊ शकतो. एकच इंजक्शन वापरणे. संक्रमित रक्ताने दूषित झालेल्या सुया आणि सिरिंजच्या माध्यमातून एच. आय. व्ही. संक्रमित केला जाऊ शकतो. लैंगिक संपर्क – एच. आय. व्ही. संक्रमण ज्यामुळे अधिक पसरते ती संक्रमण म्हणजे लैंगिक संपर्क होय. आईपासून मुलापर्यंत एच आय व्ही विषाणूची लागण असलेली गर्भवती महिला त्यांच्या सामायिक रक्त परि संचरणतून तिच्या गर्भावर व्हायरस संक्रमित करु शकते किंवा संक्रमित आई आपल्या दुधातून आपल्या बाळामध्ये विषाणू संक्रमित करू शकते.

या गोष्टी करण्याने एडस होत नाही -हात मिळवणे, मिठी मारणे, चुंबन, शिंका येणे अखंड त्वचेला स्पर्श करणे, सामान्य शौचालय वापरणे, एकच टॉवल वापरणे, एच. आय. व्ही. ग्रस्त व्यक्तीचे लाळ, आश्रू, मल आणि मूत्र याव्दारे एच. आय. व्ही. पसरत नाही. निदान -रक्त तपासणी ELISA ,रॅपीडटेस्ट  उपचार- उपचार विशिष्ट उपलब्ध नाही. परंतु लक्षणानुसार उपचार देण्यात येतो.

प्रतिबंध व नियंत्रण

आरोग्य शिक्षण- उपचार किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे सर्वसामान्य जनतेला एडस् बाबत माहिती देवून जनजागृती करता येते. रोगप्रसार टाळण्याकरिता अनैतिक लैंगिक संबंध टाळणे, निरोधचा वापर करणे इत्यादी बाबात आरोग्य शिक्षण दयावे. रक्त किंवा रक्तघटक रुग्णाला देण्यापूर्वी रक्ताची एच. आय. व्ही. साठी तपासणी करावी. एडस संशयीतांची प्रथम इलायसा तपासणी करावी. एच. आय. व्ही. विषाणूची बाधा झालेल्या स्त्रीने गर्भधारणा टाळावी व झाल्यास वैद्यकिय गर्भपात करून घ्यावा. रक्तदान, वीर्यदान, अवयवदान करण्यापूर्वी दात्याची इलायसा तपासणी करावी. निर्जंतुकीकरण केलेल्या सुया व सिरिंजेस वापराव्या.

एडस नियंत्रण कार्यक्रम

इ.स. १९९२ साली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची (NACO) जबाबदारी सोपविली. एड्स नियंत्रण
कार्यक्रमाअंतर्गत खालील कार्यक्रम राबविण्यात येतात.

सुरक्षित रक्त

राष्ट्रीय व राज्य स्तरावर रक्त संक्रमण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. एच. आय. व्ही. चाचणी विषयक धोरण- चाचणीपूर्वी व चाचणीनंतर समुपदेशन करणे बंधनकारक आहे.

लैंगिक रोग नियंत्रण कार्यक्रम

निरोधचा वापर वाढवणे, कौटुंबिक आरोग्य जागृती मोहिम १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात सन २००५ पासून बिक आरोग्य जागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभात फेरी, युवक मेळावा, भगिनी मेळावा, ट्रक ड्रायव्हर मेळावा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींनी घ्यावयाची काळजी योग्य आहार घ्यावा, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, प्रथिनांचा जास्त समावेश असावा. योग्य आहारामध्ये शरिराचे आजारापासून संरक्षण होईल. योग्य व्यायाम – यामुळे ताणतणावापासून दूर राहण्यास मदत होते. पूर्वीसारखे काम चालू ठेवणे जरुरीचे आहे. उपचार जर काही आजार असल्यास तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या. डॉक्टर सांगतिल त्याप्रमाणे नियमित औषधोपचार घ्यावेत. शारिरीक संबंधाच्या वेळी निरोधचा वापर करणे, दारु, सिगारेट व इतर व्यसनापासून दूर रहावे.

डॉ. एस. व्ही. भोई, वैद्यकिय अधिकारी आ.व कु.क.प्र. कें. कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *