कागल (शैलेश कांबळे) : भारतातील शिक्षित तरुण वर्ग हा शेती आणि दूध व्यवसायाकडे वाटचाल करत आहे याचं कारण म्हणजे वाढती बेरोजगारी याचा विचार करून तरुण वर्गा हा मार्ग निवडत आहे याचेच अवचित्य साधून कागल तालुक्यातील, श्रेयस अॅग्रोवेट चे मालक व अमूल पशु आहाराचे जिल्हा वितरक सर्जेराव तोडकर यांनी कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
कार्यशाळेचे प्रस्ताविक अमोल केदार ( कोल्हापूर जिल्हा वितरक, अमूल पशु आहार ) यांनी केले. पारंपारिक व व्यवसायिक दूध उत्पादनातील फायदे व तोटे, चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मुक्त गोठ्याचे नियोजन, वासरू संगोपन, माज संतुलन, प्रसूतिपूर्वी व प्रसूतीनंतर घेण्याची काळजी, दूध उत्पादन काळातील देण्याचा पशुआहार तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण या मुद्द्यांवर अमूलचे अधिकारी श्री रुपेश चंदनशिव यांनी शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन केले.
यावेळी कंपनीचे सेल्स ऑफिसर जीवन भांदिगरे, अरविंद पाटील तसेच अमूल पशुआहार विक्रेते अमोल करपे, ऋषिकेश यादव विश्वास तोडकर, संदीप पवार तसेच दिलिप पाटील, बळिराम शिंदे, प्रताप खाडे आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.