
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील मार्चअखेर १२५ कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प केलेल्या मुरगूड येथिल श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा जागतिक माहिला दिनाचे औचित्य साधून साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मुरगूड मुख्य शाखेतील महिला कर्मचारी सौ . मनिषा सुर्यवंशी , प्रियांका कामत , श्रीमती लता कुंभार , संचालिका सौ . सुजाता सुतार , मनिषा शिंदे , कूर शाखेतील सौ . शैला शिंदे , वैशाली पाटील , प्रतिक्षा हाटोळ , कापशी शाखेतील प्रियांका रणवरे, आणि शाखा सावर्डे बु II येथिल स्मिता खराडे अशा १० माहिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सभापती किशोर पोतदार , उपसभापती दत्तात्रय कांबळे , जेष्ठ संचालक जवाहर शहा , पुंडलिक डाफळे , दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर , संचालिका सुजाता सुतार , सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत तज्ञ संचालक जगदीश देशपांडे कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते .